अकलापूर देवस्थानाला 'ब' वर्ग दर्जासाठी सर्वोतोपरी प्रयत्न - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0

अकलापूर देवस्थानाला 'ब' वर्ग दर्जासाठी सर्वोतोपरी प्रयत्न - आमदार अमोल खताळ

​◻️ रस्त्यांच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी मंजूर; बैलगाडा शर्यतीचा घाटही लवकरच मार्गी लागणार

​संगमनेर LIVE | अकलापूर येथील श्री दत्त महाराज देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थानाच्या धर्तीवर अकलापूर देवस्थानालाही लवकरात लवकर 'ब' वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आमदार खताळ यांनी अकलापूर येथील श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर रोहित चौधरी, शैलेश फटांगरे, जनार्दन कोकाटे, जयदास गायकवाड, संतोष गायकर, शिवाजी तळेकर, अमित शेळके, नामदेव गायकवाड, लहू आभाळे, सचिन आभाळे, अमोल कापसे यांच्यासह परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​अकलापूर परिसरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सुमारे २५ लाख रुपयांच्या रस्ते विकासकामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगून आमदार खताळ म्हणाले, “अकलापूर श्री दत्त महाराज देवस्थानाचा राज्य सरकारच्या पर्यटन स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. पर्यटन विभागाच्या माध्यमातून या क्षेत्राचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

​स्थानिक नागरिकांच्या आणि भाविकांच्या आस्थेचा विषय असलेल्या अकलापूर येथील बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या घाटाचे कामही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. श्री दत्त महाराजांच्या दर्शनाने नेहमीच नवी ऊर्जा मिळते आणि याच ऊर्जेतून जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

​दरम्यान, देवस्थान समिती आणि स्थानिक नागरिकांनी विकासासंदर्भात आपल्या सूचना मांडाव्यात; आगामी वर्षाच्या नियोजन आराखड्यात या सूचनांचा प्राधान्याने विचार करून अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !