प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञानपरंपरेचा गौरव!

संगमनेर Live
0
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञानपरंपरेचा गौरव!

◻️ पद्मश्री ते डॉ. सुस्मिता विखे पाटलांच्या आधुनिक नेतृत्वापर्यंत... समृध्द ज्ञानगंगेची प्रेरक वाटचाल!

भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. गुरु केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवण करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर पैलू पाडतात. याच श्रध्देच्या व कृतज्ञतेच्या पार्श्‍वभूमीवर आषाढ पौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेचा मंगल सोहळा सर्वत्र साजरा होत असून, या औचित्याने ग्रामीण महाराष्ट्रात ज्ञानाची गंगा अविरत वाहती ठेवणाऱ्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेण्याचा लहानसा प्रयत्न.

​ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण पोहोचावे, या ध्येयाने उभारलेल्या या ज्ञानपीठाचा पाया पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी रचला. त्यांनी सहकार, शिक्षण आणि समाजसेवेचा अभूतपूर्व संगम घडवून आणत ग्रामीण भागात विकासाची नवी पहाट उगवली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेली ही ज्ञानयात्रा आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उज्ज्वल दिशा देत आहे. या परंपरेला पुढे भक्कम बळ देण्याचे कार्य पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. शिक्षणाला ग्रामीण विकासाचे मुख्य माध्यम मानत त्यांनी संस्थेला गुणवत्ता, कठोर शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भक्कम ओळख मिळवून दिली. त्यांनी उभारलेली ही शैक्षणिक परंपरा आजही प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.

​या समृध्द वारशाचा अधिक विस्तार करत संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेने आधुनिक शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नवे मानदंड निर्माण केले आहेत.

​त्याचप्रमाणे, या गौरवशाली परंपरेला आधुनिक व्यवस्थापनाची व भविष्याभिमुख शिक्षणाची नवी दिशा देण्याचे कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता राधाकृष्ण विखे पाटील अत्यंत समर्थपणे करत आहेत. त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संशोधनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिस्त, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व या सर्व क्षेत्रांत विशेष भर दिला जात आहे. त्यांच्या या प्रभावी कार्यामुळे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची परंपरा अधिक तेजस्वी, सक्षम आणि भविष्याभिमुख बनत आहे.

“​गुरुपौर्णिमेच्या या पवित्र प्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक, सर्व मार्गदर्शक, गुरुजन, शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच संस्थेला आधुनिकतेची नवी उंची प्राप्त करून देणाऱ्या डॉ. सुस्मिता राधाकृष्ण विखे पाटील यांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ज्ञान, संस्कार, सेवा आणि मानवतेचा हा अखंड दीप पुढील अनेक पिढ्यांच्या जीवनात असाच प्रकाश पसरवत राहो, हीच सदिच्छा!

​– दिगंबर तुकाराम देठे
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !