श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ९६७ ग्रॅमचा चांदीचा टोप अर्पण!

संगमनेर Live
0
श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ९६७ ग्रॅमचा चांदीचा टोप अर्पण!

◻️ पुरंदरच्या भाविकांने सहकुटुंब दर्शन घेऊन पार पाडला कुलधर्म


संगमनेर LIVE (​तुळजापूर) | साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी पुणे जिल्ह्यातील एका भाविकाने ९६७ ग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा टोप अर्पण करून आपली कुलदैवतावरील अपार श्रध्दा व्यक्त केली आहे.

​पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगरे येथील रहिवासी अभिजीत विलास काकडे यांनी आज श्री तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. दर्शनप्रसंगी त्यांनी देवीची पारंपरिक पद्ध्तीने ओटी भरून कुलधर्म-कुलाचार पार पाडले. त्यानंतर त्यांनी अत्यंत भक्तिभावाने ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप देवीच्या चरणी अर्पण केला.

दरम्यान, ​या धार्मिक प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अभिजीत काकडे यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी महेश गंजे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !