काॅग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांची सौ. प्रभावती घोगरेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

संगमनेर Live
0

काॅग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांची सौ. प्रभावती घोगरेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

◻️ ​शिर्डी विधानसभेच्या राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर खलबतं


संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसचे अभ्यासु प्रवक्ते हनुमंत पवार यांनी प्रदेश काॅग्रेसच्या सरचिटणीस तथा ज्येष्ठ काॅग्रेस नेत्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या लोणी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांमध्ये राज्यातील सद्य राजकीय स्थिती, पक्षीय बांधणी तसेच विविध सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर आणि अभ्यासपूर्ण चर्चा झाली.

​या बैठकीत काॅग्रेसची विचारधारा व पक्षाची अधिकृत भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या मुद्द्यांना तथ्यांच्या आधारे चोख प्रत्युत्तर देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल विचारविनिमय झाला. आगामी काळात राहाता-शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या स्थानिक समस्यांवर पक्षाने आक्रमक भूमिका घेऊन सातत्याने आवाज उठवण्याचा आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद वाढवून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर पक्षाची सक्रियता अधिक वाढवण्याचा निर्धार यावेळी उभय नेत्यांनी व्यक्त केला.

​हनुमंत पवार हे पक्षाची भूमिका ठामपणे आणि निर्भीडपणे मांडणारे प्रवक्ते म्हणून ओळखले जातात, तर सौ. प्रभावती घोगरे यांनी सातत्याने शिर्डी परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक सदिच्छा भेट न राहता, आगामी काळातील स्थानिक आणि प्रादेशिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीने रणनीती आखणारी ठरल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ​या बैठकीप्रसंगी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, काॅग्रेस तालुकाध्यक्ष सचिन चौगुले, शरद घोगरे, गौतम आहेर, सौ. सुनीता कोरडे यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !