हिवरगाव पावसात घरांचे पत्रे उडाले, शेडनेटसह पिकांचे मोठे नुकसान

संगमनेर Live
0

हिवरगाव पावसात घरांचे पत्रे उडाले, शेडनेटसह पिकांचे मोठे नुकसान


◻️ ​आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसराला अचानक आलेल्या जोरदार वादळाने झोडपून काढले असून, यामुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळाच्या तीव्र तडाख्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, जुनी झाडे उन्मळून पडली, तर वीजवाहिन्यांचे खांब कोसळल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याशिवाय, परिसरातील शेतकऱ्यांच्या आधुनिक शेडनेट प्रकल्पांचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

​या गंभीर परिस्थितीची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे यांनी तातडीने आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार खताळ यांनी महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. या आदेशानुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत.

​वादळानंतर हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख, ग्रामपंचायत अधिकारी हरीश गडाख तसेच महसूल अधिकारी श्रीमती आवारी यांनी संयुक्तपणे बाधित भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांनी उडालेली घरे, पडलेली झाडे, शेडनेट आणि वीजखांबांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्राथमिक पंचनामे नोंदवून घेतले. 

दरम्यान, वेळेत पंचनामे पूर्ण होत असल्याने शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

“वादळामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकाही बाधित शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक शेतातील नुकसानीचे प्रत्यक्ष व पारदर्शक पंचनामे तातडीने पूर्ण व्हावेत. प्रशासनाने अहवाल सादर करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर शासकीय भरपाई जमा करावी.” असे भाजपचे केशव दवंगे यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !