आश्वीत उद्या ‘वर्धमान इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स'च्या नूतन दालनाचा शुभारंभ!
◻️ समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या हस्ते उध्दघाटन; खरेदीवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट आणि आकर्षक भेटवस्तू!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व पंचक्रोशीतील नागरिकांना जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणे एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘वर्धमान इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स' या नामांकित शोरुमच्या भव्य नूतन दालनाचा उध्दघाटन सोहळा उद्या शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी मुख्य बाजारपेठेत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या नूतन दालनाचे उध्दघाटन समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या शुभहस्ते शुक्रवारी सकाळी होणार असून, या मंगलप्रसंगी परिसरातील सर्व ग्रामस्थ, ग्राहक आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण भंडारी परिवाराने दिले आहे.
वर्धमान इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या दर्जेदार वस्तू, ग्राहकाभिमुख सेवा आणि प्रामाणिक व्यवहार यांच्या जोरावर संपूर्ण पंचक्रोशीत ग्राहकांचा दृढ विश्वास संपादन केला आहे. नव्या अत्याधुनिक दालनामुळे परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट खरेदीचा अनुभव मिळणार आहे. येथे सोनी, सॅमसंग, एलजी, आयएफबी, वर्लपूल, गोदरेज, फिलिप्स, बजाज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसह पॉलीकॅब, आरआर केबल, ॲकर, गोल्ड मेडल अशा इलेक्ट्रिकल व वायरिंग जगतातील भारतातील अव्वल ब्रॅड्सची संपूर्ण श्रेणी अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्राहकांच्या दैनंदिन आणि आधुनिक जीवनशैलीचा विचार करता स्मार्ट टीव्ही, आधुनिक रेफ्रिजरेटर (फ्रिज), वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, किचनसाठी आधुनिक गॅस शेगडी, पंखे तसेच शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर आणि फिल्टर अशा सर्व गृहोपयोगी वस्तू येथे रास्त दरात उपलब्ध आहेत. याशिवाय हाउस वायरिंग केबल्स, दर्जेदार एलईडी बल्ब आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरेही खात्रीशीर गुणवत्तेसह मिळणार असल्याने पंचक्रोशीतील ग्राहकांना दालनात खरेदीची मोठी मेजवानी मिळणार आहे.
नूतन शोरूमच्या उध्दघाटनाचे आणि आगामी दसरा-दिवाळी सणांचे औचित्य साधून ग्राहकांसाठी विशेष सवलतींची पर्वणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खरेदीवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट दिला जाणार असून, प्रत्येक प्रमुख खरेदीवर हमखास व आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
पैशांची कोणतीही अडचण ग्राहकांच्या सणासुदीच्या खरेदीत अडथळा ठरू नये, यासाठी बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट आणि पाईनलॅब या नामांकित संस्थांमार्फत झिरो डाऊनपेमेंट व सुलभ हप्त्यांवर (ईएमआय) कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे माफक कागदपत्रांच्या आधारे ग्राहकांना आपल्या पसंतीची उपकरणे सहज घरी नेता येणार आहेत.
दरम्यान, आश्वी बुद्रुक आणि परिसरातील सर्व नागरिक, स्नेही, हितचिंतक व ग्राहकांनी उद्या शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आयोजित उध्दघाटन सोहळ्यास सहपरिवार उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी आणि भंडारी परिवाराचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन भंडारी कुटुंबाने केले आहे.