सोनिया गांधींचे आत्मचरित्र म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक - मंत्री विखे पाटील
◻️ अहिल्यानगर येथे २२ नोव्हेंबरचा ‘लोकतंत्र बचाव, भीडतंत्र हटाव’ मोर्चा!
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | देशात आणिबाणी लावण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा होता याची उपरती काॅग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांना पन्नास वर्षांनंतर झाली. त्यांचे आत्मचरित्र म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक असून, केवळ पक्षाची गेलेली विश्वासार्हता पुन्हा मिळण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टिका जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात ‘लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव’ मोर्चाचे आयोजन २२ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला भाजपाचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बॅकेचे संचालक वैभव पिचड, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, सौ. जयश्री थोरात, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, सरचिटणीस अशोक पवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहीत चौधरी यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष आणि मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी देशात काॅग्रसने अराजक निर्माण केले आहे. काॅग्रसचे नेते राहूल गांधी हातात संविधान घेतात मात्र संविधान मानायला तयार नाहीत. कोणत्याही प्रश्नाची चर्चा संसदेत करण्याची मानसिकता त्यांची नाही.
काॅग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलली धूळफेक असल्याची टिका करून मंत्री विखे पाटील म्हणालै की, खर्गे सारख्या जेष्ठ नेत्याने पंतप्रधान मोदी बद्दल अवमानकारक वक्तव्य करून काॅग्रेसची प्रतिमा अधिक मलीन केली आहे. अहिल्यानगर येथील मोर्चा ऐतिहसिक करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, काॅग्रसने निर्माण केलेल्या फेक नॅरेटिव्हला जशास तसे उतर देण्यासाठी अधिक काम बुथ स्तरापासून करावे लागाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा नेते लक्ष्मण सावजी यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्याचा जनतेशी संवाद कमी होत असल्याची खंत व्यक्त करून विरोधकांचे षडयंत्र हाणून पाडायचे असेल तर, मंडल स्तरावर नियोजनपुर्वक काम करण्याची आवश्यकता त्यानी व्यक्त केली.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी फेक नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने बोलले पाहीजे. ज्यांनी कधी शेजारच्याचे कुपन काढून दिले नाही असे लोक आज राज्यात भाषण करीत फिरत आहेत. मात्र त्यांना उत्तर देण्यासाठी तेवढ्याच ताकतीने भाजपा कार्यकर्त्यांना तत्पर राहावे लागणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा बॅकेच्या चेअरमन पदावर झालेल्या निवडीबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान, बैठकीपुर्वी पक्षाचे उपाध्यक्ष सर्जेराव मुंढे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प. रामगिरी महाराज आणि मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. भाजपाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या भागात संपर्क कार्यालय सुरू करून जनतेशी संवाद वाढविण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.