क्रिकेटर युवराज सिंहचा कमबॅक करण्याचा निर्णय, बीसीसीआयला पत्र

संगमनेर Live
0

 मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू आणि सिक्सर किंग युवराज सिंहने पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब क्रिकेट संघ म्हणजेच पीसीएच्या विनंतीनंतर निवृत्ती घेतलेल्या युवराजने पुनरागमन करण्याचं ठरवंल. 2011 च्या विश्वचषकात मालिकावीर ठरलेल्या युवराजने मागील वर्षी जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती.



पीसीए सचिव पुनीत बाली हे पहले व्यक्ती होते, ज्यांनी 38 वर्षीय युवराजसमोर पंजाब क्रिकेटसाठी पुनरागमन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. युवराज सिंहने यासंदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना पत्र लिहिल्याचंही पुनीत बाली यांनी सांगितलं.


प्रस्तावाकडे दुर्लक्ष करु शकलो नाही : युवराज सिंह
'क्रिकबझ'शी बोलताना युवराज म्हणाला की, "सुरुवातीला हा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत मला खात्री नव्हती. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणं बंद केलं होतं. मात्र जर मला बीसीसीआयकडून परवानगी मिळाली असती तर जगभरातील इतर प्रथम श्रेणी फ्रॅन्चायझी लीगमध्ये खेळणं मला सुरु ठेवायचं होतं. परंतु पुनीत बाली यांच्या प्रस्तावाकडे मला दुर्लक्ष करता आलं नाही. मी यावर फारच विचार केला, जवळपास तीन ते चार आठवडे. मला फार विचार करुन घेतलेल्या निर्णयाची गरज नव्हती हे अखेर माझ्या लक्षात आलं."



Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !