◻ ‘ बेटी बचाओ ’ अभियानाचा गजरकर्ता काळाच्या पडद्याआड.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक व एक आदर्श व्यक्तीमत्व असलेले रमाकांत गोविंद रायकर यांचे नुकतेचं अल्पशा आजाराने निधन झाले असून ‘ बेटी बचाओ ’ अभियानात सक्रीय सहभागामुळे ते जिल्ह्यात प्रसिध्द होते.
कलाशिक्षक रमाकांत रायकर यांचे मुळगाव पाथर्डी तालुक्यातील तिसगाव असून बी. एफ. ए. चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत १९९५ सालापासून ते कार्यरत होते. भूतेटाकळी येथून शैक्षणिक कार्याला सुरवात करुन आश्वी, वरंवडी, शिबलापूर, सावरगातळ, रामपूर येथिल विद्यालयात आपल्या अनोख्या शैलीतून विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे गिरवताना कला शिक्षणाविषयी आवड निर्माण केली. जिल्ह्यात ‘ बेटी बचाओ ’ अभियानात त्यानी संक्रीय सहभाग नोदंवत विविध नाटकाच्या माध्यमातून ‘ बेटी बचाओ ’ अभियानाचा जिल्ह्यात गजर केला होता. सध्या ते उंबरी बाळापूर येथिल प्रवरा माध्यमिक विद्यालयात कार्यरत होते.
दरम्यान मागील जुलै महिन्यापासून ते आजारी असल्याने नुकतेचं त्याचे निधन झाले. त्याच्या निधनची वार्ता आश्वी पंचक्रोशीत पसरल्याने माजी विद्यार्थी, शिक्षक व नागरीकानी दु:ख व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली आहे.