अहमदनगर: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली असताना सत्ताधारी पक्षाकडून सरकारची बाजू हिरीरीनं मांडली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबद्दल बोलताना महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १०% आरक्षण ही दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडं सोपवली. मात्र, तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १०% आरक्षण हे दोन्हीं प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडं सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी #MVA सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 11, 2020