उद्योग आधार ऐवजी आता उद्यम नोंदणी आवश्यक, महाव्यवस्थापक संतोष गवळी

संगमनेर Live
0

अहमदनगर : सूक्ष्‍मलघु व मध्‍यम उद्योगांसाठी उद्योग आधाराच्‍याऐवजी नव्‍याने उद्यम नोंदणी करावी लागणार आहे. दिनांक 1 जूलैपासुन ही नोंदणी सुरू झाली असूनत्‍याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. या काळात प्रत्‍येक सूक्ष्‍मलघुमध्‍यम तथा मोठ्या उद्योगांना या अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.  दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी सर्व उद्योग आधार रद्द होणार आहेत, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी दिली आहे.






            एमएसएमई मंत्रालयाने उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्‍वे प्रसिध्‍द केली असूनत्‍याची अंमलबजावणी दिनांक 01 जुलैपासून सुरू करण्‍यात आली आहे. आता उद्यमांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. जीएसटी क्रमांकआधार नंबर आणि पॅन कार्ड असेल तर उद्यमची नोंदणी घरबसल्‍या करता येणार आहे. त्‍यासाठी कुठलेही शुल्‍क आकारण्‍यात येणार नाही. एका जीएसटी क्रमांकावर एकाच उद्यमांची नोंदणी करता येणार आहे. खोटी माहिती भरली जाऊ नये यासाठी उद्यम नोंदणी प्रक्रिया पूर्णतः आयकर आणि जीएसटी प्रणालीशी जोडण्‍यात आली आहे. हा पूर्णपणे पेपरलेस उपक्रम आहे. जिल्‍हा पातळीवर उद्योजकांना ही सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची जबाबदारी जिल्‍हा उद्योग केंद्राकडे सोपविण्‍यात आली आहे. चॅ‍म्पियन्‍स प्रणालीद्वारे उद्योजकांना नोंदणी आणि त्‍यानंतरच्‍याही सुविधा पुरविल्‍या जाणार आहेत.

            अहमदनगर जिल्‍ह्यामध्‍ये प्राप्‍त अभिलेख्‍यानुसार एकुण 40 हजार 813 घटकांनी उद्योग आधार नोंदणी घेतलेली आहे. यापूर्वी उद्योग आधार नोंदणी करतांना भरलेल्‍या माहितीची प्रत्‍यक्ष पडताळणी करणारी यंत्रणा नव्‍हती. मात्रआता प्‍लान्‍ट अॅण्‍ड मशिनरीची माहिती देतांना त्‍याबरोबर मागील वर्षाचे आयकर विवरणपत्र जोडणे बंधनकारक आहे. या माध्‍यमातुन गेल्‍यावर्षी संबंधित प्‍लान्‍ट अॅण्‍ड मशिनरीची सत्‍यता पडताळणी येऊ शकेल.

            उद्योग आधाराऐवजी आता उद्यम नोंदणी प्रत्‍येक उद्योगासाठी बंधनकारक करण्‍यात आली आहे. उद्योगांनी ती 31 मार्चच्‍या आत करून घेणे आवश्‍यक आहे. तरी जिल्‍ह्यातील पात्र घटकांनी या सूचनेची नोंद घेऊन आपल्‍या घटकांची उद्यम नोंदणी दिनांक 31 मार्च 2021 पावेतो करुन घेण्‍यात याचीअसे आवाहन करण्यात आले आहे.     

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !