संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल आकाश सदाशिव आंधळे (वय - २६) याचे शुक्रवारी सांयकाळी विजेचा जोरदार धक्का बसून निधन झाले असून शनिवारी सकाळी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास आकाश आंधळे हा तरुण घरामध्ये बल्ब लावण्यासाठी गेला असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे झालेला आवाज ऐकून तेथे आलेल्या स्थानिक नागरीकानी आकाशला घुलेवाडी येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीचं त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वडील ह्यात नसल्याने घराची जबाबदारी आकाशवर होती. त्याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते व तो अविवाहीत होता. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहिण व आजी आजोबा असा परिवार आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी शोकाकूल वातावरणात आकाश च्या मृतदेहावर शेडगाव येथे अत्यसंस्कार करण्यात आले. याबाबतची खबर आश्वी पोलीस स्टेशनला शेडगावचे कामगार पोलिस पाटील दिलीप सांगळे यांनी दिली असून आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.