संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथून अक्षय संजय शिदें यांची होडा कंपनीची (एम. एच. १७ पी. आर. ९२६७) शाईन ही दुचाकी मंगळवारी मध्यरात्री घरासमोरुन चोरट्यानी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अक्षय शिदें यांने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आश्वी - शिबलापूर रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिराशेजारी माझे घर असून मंगळवारी माझी होडा कंपनीची (एम. एच. १७ पी. आर. ९२६७) शाईन ही दुचाकी घरासमोर उभी होती. परंतू मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याचे बुधवारी सकाळी माझ्या लक्षात आले. त्यामुळे कोणालाही या चोरी गेलेल्या दुचाकीबाबत काही माहिती मिळाल्यास मला 9096951123 , 9511626267 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.