संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे युवा व प्रथम लोकनियुक्त सरपंच संदीप घुगे यांची नुकतीच सरपंच सेवा संघाच्या संगमनेर तालुकाध्यक्ष पदी निवड झाली असून घुगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संदीप घुगे यानी काम करताना मागील दोन वर्षात मालुंजे गावासाठी विविध विकास योजना मजूंर करुन घेत अनेक योजनाची कामे सुरु केली असून बहुताशी योजना पुर्णत्वास गेल्या आहेत तर काही कामे अतिम टप्यात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा योजना, रस्ते, स्ट्रीट लाईट, घरकुले या कामाना प्राधान्य देण्यात आले आहे.
करोनाला आवर घालण्यात पुढाकार..
जगावर आलेल्या कोविड - १९ च्या जीवघेण्या आजारातून मालुंजे येथिल नागरीकानच्या बचावासाठी सरपंच संदीप घुगे व त्याचे सर्व सहकारी मागील सहा महिन्यापासून सर्वत्र योग्य त्या उपायोजना करत असून मुबंई, पुणे व अन्य ठिकाणाहून आलेल्या भुमिपुत्राना कोरटाईन करत त्याची सर्वोत्तोपरी काळजी घेत आहेत. त्याच्या या कामाची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थानी त्याचा ‘ कोरोना योध्दा ’ म्हणून गौरव सुध्दा केला आहे.
सरपंच संदीप घुगे याच्या याचं निस्वार्थ भावनेतुन केल्या जाण्याऱ्या कार्याची सरपंच सेवा संघाने दखल घेऊन त्याची नुकतीच संगमनेर तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे. दरम्यान त्याच्या निवडीबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आदिसह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंतासह ग्रामस्थानकडून अभिनंदन होत आहे.