संगमनेर Live | देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस शिर्डी मतदार संघातील विविध गावांमध्ये सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या उपक्रमांनी साजरा करुन कार्यकर्त्यानी सामाजिक बांधिलकी जोपासली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर सेवा सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्यमातून वृक्षारोपण रक्तदान शिबीर, रुग्णांना मदत, प्लॅस्टिक मुक्त अभियानातून पर्यावरणाचा संदेश देण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिर्डी मतदार संघात आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यानी विविध उपक्रम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
बाभळेश्वर आणि पंचक्रोशीत ७० झाडे लावण्यात आली. पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब म्हस्के माजी संचालक तुकाराम पाटील बेंद्रे, प्रवरा भाजीपाला सोसायटीचे संचालक शंकर बेंद्रे, प्रमोद बनसोडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
राहाता शहरात नगरसेविका सौ. अनुराधा तुपे यांच्यासह कार्यकर्त्यानी राहाता येथील संघप्रिय बुध्दीस्ट श्रावक संघातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले. याप्रसंगी भंन्ते महामोगलायन, भंन्ते उदय विद्यार्थी यांच्यासह दशरथ तुपे, किरण वाबळे, वाल्मिक गोसावी, अंकुश भडांगे, साजन नागरे, संदीप मुर्तडक, चेतन रनमाळे, संजय लावर आदी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ राजेंद्र वाबळे डाॅ. के. वाय गाडेकर, विजय शिंदे आदीनी पुढाकार घेवून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाना थांबवून मोफत माक्सचे वितरण करून आरोग्य सुरक्षेचा संदेश दिला. गणेश बोरकर, प्रविण तुपे, मुन्ना शहा आदी याप्रसंगी उपस्थित होते.
लोणी बुद्रुक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यानी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णांना फळांचे वाटप केले. याप्रसंगी माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, गणेश विखे, भाऊसाहेब विखे, नवनित साबळे, निलेश विखे, डाॅ. जोरी यांच्यासह नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.
आश्वी खुर्द येथेही भाजपच्या कार्यकर्त्यानी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी आलेल्या गरोदर माता आणि बालकांना फळांचे वाटप केले. याप्रसंगी डाॅ. विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, सरपंच म्हाळू गायकवाड मकरंद गुणे, बाळासाहेब मांढरे, बापूसाहेब गायकवाड, उपसरपंच सुनिल मांढरे, आरोग्य अधिकारी डॉ. कोडांजी मदने, विजय गायकवाड, मंजित गायकवाड, देविदास वाळेकर आदीनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.