संगमनेर Live | कोरानाचे संकट दिवसे - दिवस अधिक गडद होत असल्याने आपल्या ग्राहकाना विम्याचे हप्ते भरण्यासाठी नाहक त्रास व वर्दळीच्या ठिकाणी यावे लागू नये यासाठी संगमनेर येथिल भारतीय जीवन विमा निगम ने ग्रामीण भागातील आश्वी खुर्द येथे विमा पॉलिसी धारकांना आपला विमा हप्ता गावातच भरता यावा यासाठी आश्वी खुर्द येथे हप्ता भरणा केंद्राची उंभारणी केली आहे.
संगमनेर येथिल भारतीय जीवन बीमा निगम कार्यालयाचे विकास अधिकारी संजय खरात यानी आश्वी परिसरातील विमा पॉलिसी धारकांना संगमनेर व इतर ठिकाणी जाऊन पैसे भरण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने विमा पॉलिसी धारकांची मोठी गैरसोय होत असल्याचे ओळखले. ही गैरसोय दूर करण्यासाठी संजय खरात यांच्या पुढाकाराने नुकतेच आश्वी खुर्द येथे विमा भरणा केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचा शुभारंभ कु. अनविता संजय खरात हिच्या हस्तें करण्यात आला.
यावेळी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक अँड. अनिल भोसले, विनायक थोरात शिवाजी मुंडे, देविदास वाळेकर, विनायक भोकरे, पत्रकार संजय गायकवाड, विमा प्रतिनिधी राहुल भोकरे, बाळासाहेब डहाळे, प्रदिप वाल्हेकर, वैभव गाढे, गणेश भोसले, अभय वाळेकर, अतुल मुन्तोडे, रवीद्रं भोसले आदी उपस्थित होते. दरम्यान हे विमा भरणा केदं सुरु झाल्यामुळे पंचक्रोशीतील नागरीकाना दिलासा मिळाला असून विमा धारकानी या सेवा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय खरात यांनी केले आहे.