◻ दोन्ही एटीएम सुरळीत करा, अन्यथा कुलुप लावु ; सरुनाथ उंबरकराचा इशारा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया व सेट्रंल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या दोन शाखा व दोन एटीएम केद्रं आहेत. परंतू कोरानाच्या संकटकाळात बँकेची एटीएम सेवा पुर्णपणे ठप्प झाल्याने स्थानिक ग्राहकाना मोठा मनस्ताप सहन करत एटीएम असून अडचण नसून खोळबा असे म्हण्याची वेळ आली आहे. तर संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्ष नेते सरुनाथ उंबरकर यांनी आक्रमक भूमिका घेत एटीएम व्यवस्था सुरळीत न झाल्यास कुलुप लावण्याचा इशारा दिला आहे.
आश्वी परिसरात असलेल्या स्टेट व सेट्रंल या दोन सरकारी बँका असूनही खातेदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या सेंट्रल बँकेचे आश्वी बुद्रुक येथे तर आणि स्टेट बँकेचे आश्वी खुर्द येथे एटीएम आहे. यात सेंट्रल बँकचे एटीएम सुरू झाल्यापासून काही काळ सोडल्यास ते सदैव बंदच असते. तर स्टेट बँकेचे एटीएम हे वारवार नादुंरुस्त असल्याची तक्रांर नागरीक करत आहेत. त्यामुळे बँकांमध्ये नागरीकाची मोठी गर्दी होत असते. परिसरातील चिंचपूर, प्रतापपूर, निमगावजाळी, आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापुर, ओझर, आश्वी खुर्द, पिंप्री लौकी अजमपुर, शिबलापुर, पानोडी, हजरवाडी, मालुंजे, हंगेवाडी, शेडगाव मांची आदि गावातील ग्रामस्थांचे आर्थिक व्यवहार आश्वी येथिल दोन्ही राष्ट्रीयकृत बँकेत असल्याने त्यांना दैनंदिन व्यवहारात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या कोरोनाच्या संकटात आश्वी परिसरात बांधीत रुग्णाचे प्रमाणात वाढत असल्याने खातेदार बँकेत न जाता एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी जाताय मात्र या दोन्ही एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकाची निराशा होते. तर याबाबत बँकेकडे चौकशी केली असता एटीएम यंत्रणा वेगळी आहेत, तुम्ही त्याच्याकडे चौकशी करा अशी उडवाउडवीची उत्तरे ग्राहकाना दिली जातात. तसेच शनिवार, रविवार व इतर शासकीय सुट्यामुळे बँका बंद असतात. अशावेळी खातेदारांना पैशाची मोठी गरज निर्माण होते असते. मात्र एटीएम मध्ये गेले तर एटीएम बंद, पैसे नाही, बिघाड झालेला यामुळे ग्राहकाना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान वारंवार तक्रांर करूनही एटीएम सुविधा पूर्ववत सुरू होत नसल्याने ग्राहकाना बँकेत पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने सोशल डिस्टसिगंचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोना बांधीतानमध्ये भर पडण्याची शक्यता वाढल्याने त्याची जबाबदारी कोण घेणार.? एटीएम सुविधा लवकरात सुरळीत न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन्ही बँकांना कुलूप ठोकले जाईल असा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर यांनी दिला असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकीकडे व्यवहार कॅशलेस व ऑनलाइन करा असे सांगत असताना आश्वी परिसरातील खातेदारांना बँकेत दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच मास्क, सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडत असुन त्या संदर्भातील नियम धाब्यावर बसवले जात असून ग्राहकाना अडथळ्याची शर्यती पार करून बँकेतून पैसे मिळत असले तरी यासाठी मोठा त्रासही खातेदारांना सहन करावा लागत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत तात्कळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.