काय.? संगमनेर तालुक्यात इतक्या लाख लोकांना मिळाला दारु पिण्याचा परवाना.

संगमनेर Live
0
◻ मद्य सेवन परवाना काढण्याकडे युवकांचा कल ; चार ते पाच हजार ग्राहकाची दररोज घरपोच मद्य सेवेसाठी नोंदणी.

संगमनेर Live (राजेश गायकवाड) | संगमनेर तालुक्यात लॉक डाउन काळात मद्य विक्री बंद होती. आता अनलाँकनंतर नियमितपणे मद्य विक्री सुरू झाल्याने नागरीकांची दारु दूकाने, बार व वाईन शॉप येथे गर्दी करत आहेत. त्यामुळे मद्द सेवन ऑनलाइन परवाना काढण्यासाठी मद्यप्रेमीचा कल वाढत असून मागील सहा महिन्यात संगमनेर तालुक्यात सुमारे दीड लाख मद्यप्रेमीनी ऑनलाइन मद्द सेवनचा परवाना काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मार्च महिन्यात केंद्राने देशभरात लॉकडाउन केल्यानंतर मद्य विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अनलॉक नंतर हळूहळू मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली. परंतु यावेळी शासनाने कोरोनाचा वाढता धोका ओळखून गर्दी होऊ नये यासाठी घरपोहच मद्द विक्री करण्याची शक्कल काढली. मात्र याला शहरी भागात चागला प्रतिसाद मिळात असला तरी ग्रामीण भागात अडचणीत येत होत्या. अनलाँकनंतर व्यवहार सुरळीत होत असताना मद्द विक्रीतून शासनाला चांगला महसुल मिळण्यास सुरवात झाली. पुन्हा मद्द विक्री सुरु झाल्यानतंर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री परवाना धारकांनी परवान्याचे नुतनीकरणासाठी शासनाकडे अर्ज केले. त्यापैकी सुमारे १० हजार २ परवान्याचे नुतनीकरणाला शासन मान्यता मिळाली.

राज्य शासनाने ३ मे २०२० पासून मद्द विक्री करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. राज्यात १५ मे पासून घरपोच मध्य विक्री योजना अंमलात आणण्यात आली. आता लॉकडाऊन नंतर व्यवहार नियमित सुरू झाल्याने पुन्हा एकदा मद्यप्रेमीनी दुकानाकडे आपला मोर्चा वळविला असला तरी अद्यापही घरपोच मध्य विक्री सुरूच आहे. सध्या दररोज चार ते पाच हजार ग्राहक घरपोच मध्ये विक्रीसाठी नोंदणी करत असल्याची माहिती मिळाली असून विशेषता शहरात घरपोच मध्ये विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर ग्रामीण भागात ऑनलाइन मद्द मागण्यापेक्षा बारमध्ये जाऊन बैठकीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. 

दरम्यान संगमनेर तालुक्यात १ एप्रिल ते १८ सप्टेंबर २०२० या सहा महिन्याच्या काळात मद्द सेवन परवाना मिळविण्यासाठी १ लाख ५६ हजार ८५ मद्यप्रेमी ग्राहकांनी अर्ज आँनलाईन दाखल केले होते. त्यापैकी १ लाख ५० हजार ९५५ नागरिकांना मद्य सेवन परवाना देण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. आँनलाईन अर्ज करतांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन सुधारणा करण्यात आली आहे. संगणक, लॅपटॉप मोबाईल तसेच इतर माध्यमातून आँनलाईन मद्य सेवन करून परवाने नागरिकांना घेता येणार आहे. आँफ लाईन पध्दतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात देखिल अर्ज करून परवाना दिला जात आहे. एका वर्षाच्या परवानासाठी १०० रूपये तर आजीवन परवानासाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जाते.

लाँकडावून नंतर मद्य विक्रीत मोठी वाढ झाली असून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल उपलब्ध झाला आहे. मद्द सेवनात युवकांचा सहभाग अधिक असुन नविन पिढी मद्याच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र पाहवयास मिळत आहे. शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागात मद्य विक्री परवाने काढण्यासाठी चढाओढ दिसुन येत आहे. बनावट तसेच विनापरवाना मद्य विक्रि मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ते माठे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी बनले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !