◻ तालुक्यात ७२ बांधीताची भर पडल्याने काळजी वाढली.
संगमनेर Live | शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ७२ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे. तर आश्वी परिसरातील गावानमध्ये तब्बल १९ बांधीत रुग्ण आढळल्याने आश्वी परिसराला मोठा हादरा बसला आहे.
यामध्ये शुक्रवारी हंगेवाडी येथे ६, प्रतापपूर येथे ५, चिचंपूर येथे ५, रहिमपुर येथे १, कोंची येथे १ व कणकापूर येथे १ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे एकाचं दिवसात तब्बल १९ बांधीताची भर पडली आहे. तर तालुक्यातील इतर गावाची मिळून ७२ रुग्णसंख्या झाली आहे.
आतापर्यंत आश्वी खुर्द येथे १५ बांधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी २ जण उपचार घेत आहेत. आश्वी बुद्रुक येथिल २३ बांधीत रुग्णापैकी २ रुग्ण उपचार घेत आहेत. चिचंपूर येथिल ४१ बांधीतापैकी २१ रुग्ण उपचार घेत आहेत. हंगेवाडी येथिल ८ बांधीतापैकी ७ जणावर उपचार सुरु आहेत. प्रतापपूर येथिल ११ बांधीतापैकी ७ जणावर उपचार सुरु आहेत. शेडगाव येथिल ११ बांधीत रुग्णापैकी ३ रुग्ण उपचार घेत आहेत. कनोली येथिल २५ बांधीत रुग्णापैकी ५ रुग्ण उपचार घेत आहेत. निमगावजाळी येथिल १५ बांधीत रुग्णापैकी १ रुग्ण उपचार घेत आहे. ओझर खुर्द येथिल १२ बांधीत रुग्णापैकी १ रुग्ण उपचार घेत आहे. तर रहिमपुर येथिल २६ बांधीत रुग्णापैकी १ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच बाकीचे बांधीत रुग्ण हे ठणठणीत बरे होऊन घरी आले आहेत.
तसेच मनोली येथे आतापर्यंत २१ बांधीत रुग्णापैकी १ जणाचा मृत्यू झाला असून बाकीचे रुग्ण बरे झाले आहे. तर डिग्रस येथिल ४ बांधीत रुग्णापैकी १ जणाचा मृत्यू झाला असून तिघे बरे झाले आहेत. शिबलापूर येथे आतापर्यत सापडलेल्या १७ रुग्णापैकी १ रुग्णाचा मृत्यू झाला असून बाकीचे बरे झाले आहेत. दरम्यान उंबरी बाळापूर येथिल २, सादपूर येथिल ८, वरंवडी येथिल १, औरंगपूर येथिल ७, चणेगाव येथिल २, दाढ खुर्द येथिल ५, खळी येथिल ४, खांबे येथिल ३, मालुंजे येथिल ६, पानोडी येथिल ५, पिपंरणे येथिल ९ व पिप्रीं - लौकी येथिल ६ बांधीत रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी आले आहेत.
दरम्यान संगमनेर तालुक्यात आतापर्यत २ हजार ९५६ बांधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी २ हजार ६३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर २८९ बांधीत रुग्णावर उपचार सुरु असून आतापर्यत ३६ बांधीताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तालुक्यात ८९.०१ टक्के असून मृत्यूचे प्रमाण १.२२ टक्के ऐवढे आहे.