◻ सर्वसामान्यसह शेतकरी वर्गात घबराहट.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील अनेक वर्षापासून बिबट्या व रानडूकराची मोठी दहशत आहे. त्यातचं आता दिवसे - दिवसे मोठ्या संख्येने विषारी नाग आढळून येत असल्याने बिबट्यानतंर आता विषारी नागाची भर पडल्याने सर्वसामान्यसह शेतकरी वर्गाचा जीव टागणीला लागला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, मालुंजे, शिबलापूर, वरंवडी, दाढ, प्रतापपूर, सोनगाव, पिप्रीं, खळी, पानोडी आदिसह पंचक्रोशीतील गावानमध्ये मोठ्या संख्येने नाग आढळून आल्याची माहिती स्थानिक सर्पमित्र शिवा पवार यानी दिली असून मागील दोन महिन्यात लहान मोठे ५० ते ५५ विषारी नाग, ४ मणियार आदिसह धामण कवड्या, तस्कंर असे बिनविषारी साप पकडून निसर्गात मुक्त केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हे विषारी नाग थेट वर्दळीची ठिकाणे असलेल्या घरानमध्ये आढळून येत असल्याने नागरीकानमध्ये भिती वाढली आहे. त्यामुळे या विषारी नागापासून बचाव व्हावा यासाठी वनविभागाने या परिसरात विशेष मोहीम राबवून नागरीकाना धिर देऊन उपाय योजनाबाबत प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा जीव ही टागणीला लागला आहे.
विषारी नागाची संख्या वाढण्याची कारणे..
याबाबत जाणकार व्यक्तीने दिलेली माहिती अशी की, आश्वी पंचक्रोशीतील गावे ही प्रवरानदी तिरावर वसलेली असून या परिसरात नाग, घोणस, धामण, गवत्या, मांडूळ, कवड्या, तस्कंर आदि प्रजातीचे साप मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून आहेत. परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी जमीनीत खोलवर झिरपल्याने जीव वाचवण्यासाठी जमीनीखालील अधिवास सोडून विषारी नाग व इतर सरपटणारे प्राणी बाहेर आले आहेत. तर या वर्षी झालेल्या वातावरणातील बदलामुळे दुर्मिळ विषारी सापाची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच बेडूक व उंदीर हे नागाचे आवडते खाद्य असल्याने खाद्याच्या शोधात ते परिसरातील घरानमध्ये घुसत आहेत.
काय काळजी घ्याल..
विषरी नागाची संख्या वाढल्याने नागरीकानी आपल्या घरात व घराशेजारी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. घराशेजारी गवत होऊ न देता घरालगत सरंपण, उखाडे सापाना लपण्यासाठी जागा होणार याची दक्षता घ्यावी. तसेच साप आढळून आल्यास घाबरुन न जाता त्याला मारण्याऐवजी संर्पमित्राला फोन करुन निसर्गात मुक्त करावे.
टिप :- सर्पमित्र शिवप्रसाद उर्फ शिवा पवार (आश्वी पंचक्रोशी), मो - 7744070091