संगमनेर Live (अहमदनगर) | औषध निर्माण अधिकारी संघटना अहमदनगर यांचे वतीने २५ सप्टेंबर रोजी जागतिक औषध निर्माता दिन अहमदनगर येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष अविनाश देशमुख, कार्याध्यक्ष विजय देवरे, सचिव दशरथ वाणी, कोषाध्यक्ष विजय ढाकणे, राज्य उपाध्यक्ष तुकाराम सांगळे, अरुण पेडगावकर, सहसचिव जनार्दन सानप, राज्य संघटना महिला प्रतिनिधी स्वाती ठुबे हजर होते. अहमदनगर संघटनेचे वतीने राज्य पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
कंत्राटी औषध निर्माण अधिकारी कै. गणेश बारवकर यांचे कोरोना आजारामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. संघटनेचे वतीने जिल्हा औषध निर्माण अधिकारी संघटना अहमदनगर व राज्य शासकीय औषध निर्माण अधिकारी नगर यांचेकडून १ लाख २१ हजार ६०० व औषध निर्माण अधिकारी संघटना ,शाखा नांदेड कडून १ लाख रुपये एकूण रुपये २ लाख २१ हजार ६०० रुपये बारवकर यांचे पत्नी व मुले यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा औषध निर्माण अधिकारी कार्यकारिणी मध्ये योगेश ठाणगे, राजेश कांबळे, राजश्री आपटे, दत्तात्रय राऊत व रमेश तनपुरे यांची नियुक्ती करणेत आली. राज्य संघटनेचे पदाधिकारी यांचेकडून त्यांचा संत्कार करणेत आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अहमदनगर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात नगर संघटनेचे अध्यक्ष तुकाराम सांगळे,उ पाध्यक्ष स्वाती ठुबे ,संघटक संजय सुकाळकर, सल्लागार जयंत कुलकर्णी, प्रकाश भंडारी, भगत व राजश्री आपटे यांचा संत्कार केला. राज्य संघटनेचे पदाधिकारी यांनी राज्य स्तरावर चालू असलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर केला.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संघटनेचे संघटक संजय सुकाळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी योगेश ठाणगे, राजेश कांबळे, वृषाली मकासरे यांनी विशेष परिश्रम घेतले.