आश्वी बुद्रुक येथे जमिनीच्या वादामुळे गळफास घेऊन आत्महत्या.

संगमनेर Live
0
आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मयताच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या ; सात जण ताब्यात.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जमिनीच्या वादामुळे येथिल दिनकर यादव वर्पे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानतंर पोलीसानी सात जणाना ताब्यात घेतले आहे.

याबाबत दिनकर वर्पे यांचा मुलगा मुकेश वर्पे याने दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, आमच्या घराच्या पश्चिमेला चुलते माधव उर्फ गोरख वर्पे यांची १५ गुंठे जमीन व घर आहे. त्या ठिकाणी ते एकटेच राहत होते. त्याची पत्नी व मुले ममदापूर (ता. राहाता) या ठिकाणी राहत होते. गट नं G2/2 ही जमीन चुलते यांनी २०१७ मध्ये विक्रीस काढल्यानतंर वडिलानी आईच्या नावे खरेदी घेतली होती. त्यानतंर २०१९ मध्ये माझे चुलते मयत झाले.

आम्ही चुलत्याची जमिन विकत घेतल्यामुळे ऑगस्टं २०१७ मध्ये आतेभाऊ दादासाहेब उर्फ पप्पू तांबे, चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे, आतेबहीन राणी तांबे, मामा भानुदास तांबे व आत्या अलका तांबे (सर्व रा. चिचंपूर, ता. संगमनेर) यांनी वडीलाना जमीन खरेदी केल्यामुळे शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर मागील १५ दिवसापासून माझी चुलती चद्रंकला वर्पे ही चुलत आजी नंदाबाई वर्पे (रा. आश्वी बुद्रुक) व दादासाहेब तांबे (रा. चिचंपूर) याच्यां घरी राहत होती. आठ दिवसापूर्वी माझे वडील दुकानात असताना आतेभाऊ दादासाहेब उर्फ पप्पू तांबे तेथे आला व त्याने “ इतराच्या काय नादी लागतोस माझ्या नादी लाग तुला भोसकून टाकतो ” असा दम दिला होता. 

१८/१०/२०२० रोजी दुपारी चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे, आशुतोष वर्पे, चुलती चद्रंकला वर्पे व एक अनओळखी मुलगा आले व आमची अडीच गुंठे जमिन काढूण द्या असे म्हणाले. त्यावेळी वडिलांनी आम्ही जमीन विकत घेतल्याचे सागंत तुमची येथे जमीन नसल्याचे सागितले. त्यामुळे त्यानी “ एक - एकाचे मुडदे पाडू ” अशी दमबाजी करुन आम्ही विकत घेतलेल्या जमीनीत पोल रोवले. पोल रोवण्यासाठी दत्तात्रय वर्पे, नंदाबाई वर्पे यांनी त्याना मदत केली. यावेळी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे व आशुतोष वर्पे यांनी वडीलाना मारहाण करत “ उद्या या जागेवर शेड ठोकतो तु काय करतो ” असे म्हणत दम दिला. त्यामुळे वडीलानी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रांर दाखल केली होती.

दि. १९/१०/२०२० रोजी सकाळी आम्ही चारा काढण्यासाठी शेतात गेलो असता वडील घरी ऐकटे होते. चारा घेऊन आई घरी आल्यानंतर मोठ्याने ओरडली त्यामुळे जाऊन पाहिले असता वडील दोरीच्या साहयाने गळफास घेतल्याने मयत झाले होते. त्यामुळे शेजारील लोकाच्या मदतीने वडीलाना खाली घेऊन आश्वी पोलीसाना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीसानी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असता यावेळी वडीलाच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या.

त्यातील एका चिठ्ठीत चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे, आशुतोष वर्पे व चुलती चद्रंकला वर्पे यांच्या मानसिक त्रासाला कटाळून तर दुसऱ्या चिठ्ठीत दादासाहेब उर्फ पप्पू तांबे, भानुदास तांबे, अलका तांबे, भिमाजी तांबे, सचिन तांबे, राणी तांबे यांच्या मानसिक छळाला कटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते. त्यामुळे या ९ जनाविरुध्द आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रंजिस्टर नबंर ४२२/२०२० नुसार भादंवी कलम ३०६, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून पोलीसानी ७ जणाना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !