◻ आश्वी परिसरातील गावानमध्ये पुन्हा बाधीत रुग्ण आढळले.
संगमने Live | मंगळवारी (२० ऑक्टोबर) रोजी वाढ झाली असून आज तालुक्यात २२ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर आश्वी परिसरालातील कनोली व रहिमपूर या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळला आहे.
मंगळवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ४, कनोली येथे १, रहिमपूर येथे १, पेमगिरी येथे २, सारोळे पठार येथे २, जवळे बाळेश्वर येथे १, चिकणी येथे १, घुलेवाडी येथे २, गुंजाळवाडी येथे १, निळवंडे येथे १, जोर्वे येथे १, मिरपूर येथे १, डोगंरगाव येथे १, चिखली येथे १, पिपंळगाव कोझिंरा येथे १ व सावरगाव तळ येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात २२ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील कनोली व रहिमपूर या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.