◻ तालुक्यासह आश्वी परिसरात रुग्ण वाढीचा वेग मंदावला. परंतु त्या दोन गावानमध्ये पुन्हा बांधीत रुग्ण आढळले.
संगमनेर Live | रविवारी रोजी संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला होता. त्यात सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी थोडीशी वाढ झाली असून आज तालुक्यात १४ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर आश्वी परिसरालातील शेडगाव व खळी या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळले आहेत.
सोमवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ६, शेडगाव येथे १, खळी येथे १, अंभोरे येथे १, सारोळे पठार येथे २, वडगाव लाडंगा येथे १, जोर्वे येथे १ व पेमगिरी येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात १४ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील शेडगाव व खळी या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.