◻ सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल ; तीन जन ताब्यात.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात कामगार तलाठी संग्राम देशमुख यांना अवैध रित्या वाळु वाहतूक करणाऱ्या तिघानी प्रवरा नदी पात्रात आरे - रावी तसेच धक्का बुक्की केल्याची तक्रांर आश्वी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत कामगार तलाठी संग्राम देशमुख यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, रविवारी सकाळी आश्वी पोलीस स्टेशनला सरकारी पंच होण्यासाठी मी व कामगार तलाठी सुमित जाधव दुचाकीवरुन चाललो असताना प्रवरा नदीपात्रात अवैध रित्या वाळु वाहतूक सुरु आहे का.? हे पाहण्यासाठी मी नदीपात्रात गेलो होतो. यावेळी तेथे तीन मोटरसायकलीवर गोण्यानमध्ये वाळू भरत असलेल्या विजय माळी, राजेंद्र नागरे, अनिल नागरे (सर्व रा. प्रतापुर) यांच्याकडे वाळू वाहतूकीचा परवाना नसल्यामुळे मोटरसायकल सह आश्वी कामगार तलाठी कार्यालयात चालण्यास सांगितले. त्यामुळे त्याना राग आला “ आम्ही याच गावचे असून आमचे कोणी काहीच वाकडे करु शकत नाही ” असे म्हणत ते आगांवर धावून आले व मला धक्का बुक्की तसेच शिवीगाळ केली. यानतंर ते मोटर सायकल वरुन भरधाव वेगाने निघून गेले असल्याचे दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रंजिस्टर नबंर ४१९/२०२० नुसार भादंवी कलम ३५३, ३३२, ३७९, ५११, ५०६, ३४ व पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुंधाकर मांडवकर याच्यां मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस करत आहेत. तर तिघाना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीसानी दिली आहे.