◻ हभंप उध्दव महाराज मंडलिक सह राजेद्रं विखे पाटील व मान्यंवर राहणार उपस्थित.
संगमनेर Live | राज्याचे माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुंभहस्ते आज दि. ११ ऑक्टोबर रोजी (रविवार) संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नव्याने सुरु होत असलेल्या साई स्वास्तिक ट्रेडिंग या शोरुमचे उध्दघाटन सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
आश्वी खुर्द येथिल रहिवासी व सिव्हिल इंजिनियर असलेल्या साईप्रसाद राजेद्रं मांढरे यानी आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून आश्वी बुद्रुक - दाढ रस्त्यावरील भारतीय स्टेट बँके समोर साई स्वास्तिक ट्रेडिंग कं. या शोरुमची उभारणी केली असून हे शोरुम झाल्यामुळे आश्वी सह पंचक्रोशीतील नागरीकाना बांधकाम, प्लबिगं, हार्डवेअर साहित्य, ग्रेनाईट, कडप्पा, फरशी, सर्व प्रकारचे स्टील, लोखंडी व सिमेंट पत्रे, मुरघास बँग, गायीसाठी मँट, शेती उपयोगी व कुक्कुट पालनासाठी लागणारे सर्व साहित्य एका छताखाली व योग्य दरात उपलब्ध करुण देण्यात येणार असल्याची माहिती साईप्रसाद मांढरे यांनी दिली.
रविवारी सायंकाळी होणाऱ्या उध्दघाटन संभारभाच्या अध्यक्षस्थानी लोणी खुर्द येथिल वरद विनायक सेवाधामचे संस्थापक हभंप उध्दव महाराज मंडलिक राहणार असून यावेळी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे सचिव व विशवस्त डॉ. राजेद्रं ए. विखे पाटील, नारायणगाव येथिल जयहिंद ट्रेडर्सचे जितेंद्र गुंजाळ पाटील, मंचर येथिल निवास एजन्सीचे हरिश्चंद्र थोरात पाटील आदि उपस्थित राहणार आहे.
दरम्यान या संभारभासाठी पंचक्रोशीतील नागरीकानी शासकीय नियम व सुचनाचे पालन करुन या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रभाकर मांढरे, बाळासाहेब मांढरे, राजेद्रं मांढरे, डॉ. अरुण मांढरे, लक्ष्मीकांत मांढरे, नितीन मांढरे, माजी जिल्हा परिषद सदंस्या कांचनताई मांढरे व साईप्रसाद मांढरे यांनी केले आहे.