◻ घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांन विरूद्ध गुन्हा दाखल.
संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथील किशोर सुरेश बनसोडे यांच्या घराचा कोडां तोडून चोरट्यांनी कपाटातली सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साकूर परिसरातील वनवे नगर याठिकाणी किशोर बनसोडे हे आपल्या कुटूंबा सोबत राहात आहे. त्यांनी त्यांच्या मळ्यात नवीन घर बांधले आहे. त्यामुळे बनसोडे व त्यांची पत्नी यांनी घरातील सर्व साहीत्य आटपून ठेवले होते त्याच बरोबर सोन्याचे सर्व दागिने व पैसै कपाटात ठेवले होते. शुक्रवारी घरभरणी करण्यासाठी ते मळ्यात गेले होते. तर शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कोडां तोडत आत मध्ये प्रवेश केला व कपाट उचकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सर्व ऐवज चोरून पोबारा केला.
पहाटे आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी तातडीने घटनेची माहिती बनसोडे यांना दिली. त्यामुळे बनसोडे यांनी घरी येवून पाहिले असता चोरट्यांनी कपाटातली साहित्य उचकटून खाली टाकले होते. त्यामुळे या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजाताच साहयक पोलिस निरिक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी किशोर बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरूद्ध गुन्हा रंजिस्टर नंबर ३३६/ २०२० भांदवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास साहयक पोलिस निरिक्षक जीवन बोरसे हे करत आहे.