अहो साहेब.. कांद्याच पिक गेल वाया, आता शेतकऱ्यानी कस जगायचं.?

संगमनेर Live
0

◻ हिवरगाव पठार परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा.

संगमनेर Live (राजू नरवडे) | अहो साहेब.. सेंद्री कांद्याच पिक जास्त पाऊस झाल्यामुळे वाया गेल्यामुळे ७० हजार रुपये खर्च अंगावर पडला. त्यामुळे साहेब आता तुम्हींच सांगा कोरोनाच्या महामारीत आंम्ही शेतकऱ्यानी जगायचं तरी कसं.? अशा काळीज हेलावणाऱ्या व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार येथील ताराबाई ऊगले, बाळासाहेब वनवे आदिसह परिसरातील शेतकऱ्यानी पत्रकार राजू नरवडे यांच्यापुढे मांडल्या असून मात्र कांदा महाग झाला म्हणून कंठ फाडून आरडा - ओरड करणारे आता गप्प बसल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील हिवरगाव पठारसह आजू बाजूच्या परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी पावसाळ्यात सेंद्री लाल कांद्याचे पिक घेत असतात. त्यामुळे या ही वर्षी ताराबाई ऊगले यांनी दीड ते दोन महिन्यांनपुर्वी आपल्या सव्वा एकर शेतीमध्ये कांदा केला होता. त्यासाठी खते, औषधे, फवारनी व मंजूरी असा एकूण ७० हजार रूपये खर्च झाला होता. सुरूवातीला कांद्याचे पिक अतिशय चांगले आले होते. यावर्षी आपल्या कांद्याचे चांगले पैसे होतील अशी अपेक्षा ताराबाई ऊगले यांना होती. पण मध्यंतरी झालेल्या धुव्वाधार व ढगफुटी सदृश्य पावसाने संपूर्ण कांद्याचे पिक पाण्याखाली गेले. त्यातचं कांद्याला जास्त पाणी सहन होत नसल्याने कांद्याच्या मुळ्या सडून कांद्याच्या पाथीला पिळ पडला. त्यातून पुन्हा ते कांद्याचे पिक पुर्ववत झाले नाही. परिणामी आज कांद्याचे पिक पूर्णपणे वाया गेले आहे. 

त्यामुळे साधा खर्चही फिटला नसून उलट ७० हजार रूपये अंगाशी आले आहेत. यामुळे ताराबाई यांनी डोक्यालाच हात लावला असून यावर्षी पावसाने काहीच ठेवले नसल्याची दयनीय अवस्था शेती पिकांची झाली आहे. परंतू शेतकऱ्यांचे ऐवढे नुकसान होऊनही निरढावलेली शासन व्यवस्था साधे पंचनामे करायला तयार नाही. आधीच एका मागून एक आलेल्या आसमानी संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. त्यात वरून कोरोना सारख्या महामारीने शेतकऱ्याचे कबरडे मोडल्याने जगाव की मराव अशी अवस्था आमच्या सारख्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची झाल्याच्या व्यथा शेतकरी ताराबाई ऊगले यांनी पत्रकार राजू नरवडे याच्यांपुढे मांडल्या आहेत. 

हिवरगा पठार परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे सेंद्रि कांद्याच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून जवळपास एक एकर कांद्यासाठी शेतकऱ्याचा ६० ते ७० हजार रूपये खर्च झाला आहे. त्यात पुन्हा शेतकऱ्यानी तीन ते चार हजार रूपये किलोने कांद्याचे बियाणे खरेदी करून रोप टाकले होते. मात्र ती ही पावसामुळे वाया गेली आहेत. आज शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती झाली आहे. वास्तविक पाहता शासनने पंचनामे करणे गरजेचे होते. परंतू प्रशासनकडून साधी पहाणी करण्यासाठी ही कोणी फिरकले नसल्याची कैफियत हिवरगाव पठार येथिल शेतकरी बाळासाहेब वनवे यानी पत्रकार राजू नरवडे यांच्याकडे मांडली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !