◻आंबीखालसा फाट्यावर गतिरोधकामुळे घडली घटना.
संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकवर दोन कारचा अपघात होवून केवळ दैव बल्वत्तर असल्याने पाच जण बालंबाल बचावले असून ही घटना सोमवार (दि. ५ ऑक्टोबर) रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की कार क्रमांक (G.J 19 A.M 6163 ) व दुसरी कार क्रमांक (M.H.15. G.X.9566 ) या दोन्ही कार सोमवारी संगमनेर कडून पुण्याच्या दिशेने जात होत्या. दुपारी दोन्ही कार आंबीखालसा याठिकाणी असलेल्या गतिरोधकवर आल्या असता त्याच दरम्यान एका कारने दुसऱ्या कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पहील्या कारचा टायर फुटून ती थेट दुभाजकावर चढली तर दुसरी कार बाजूला गेली. त्यामुळे केवळ दैव बल्वत्तर असल्याने दोन्ही कार मधील पाच जण बालंबाल बचावले आहेत. तर अपघातामध्ये दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिस स्टेशनचे साहय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस काॅन्सटेबल किशोर लाड, हरिशचंद्र बांडे, प्रमोद चव्हाण आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर क्रेनच्या साहय्याने दोन्ही वाहणाने महामार्गावरून बाजूला घेण्यात आली. दरम्यान आंबीखालसा गतिरोधकवर सफेद पट्टे न मारल्यामुळे येणाऱ्या लहान मोठ्या वाहण चालकांच्या लक्षात हा गतिरोधक येत नाही. अचानक वाहन चालकांनी ब्रेक दाबल्यावर हे अपघात होवू लागले आहे. दिवसा आड अपघातात होवू लागल्याने वाहन चालकही वैतागले आहेत. तसेच एकल घाट, डोळासणे, चंदनापूरी घाट आदि ठिक ठिकाणी महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डा हुकवायच्या नादातही अनेक अपघात होत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने या गतिरोधकवर सफेद पट्टे मारावे व महामार्गावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे त्वरीत बुजवावे अशी मागणी वाहण चालकांसह नागरिकांनी केली आहे.