◻ आज आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये नव्याने बांधीत गावाचा समावेश.
संगमनेर Live | गुरुवारी (८ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात ३९ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे. आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, हंगेवाडी, रहिमपूर, प्रतापपूर यासह नव्याने झरेकाठी येथे ही बांधीत रुग्ण आढळून आला आहे.
गुरुवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ७, उंबरी बाळापूर येथे २, आश्वी खुर्द येथे २, झरेकाठी येथे १, हंगेवाडी येथे २, रहिमपूर येथे १, प्रतापपूर येथे १, दाढ बुद्रुक येथे १, जोर्वे येथे ४, कोकणगाव येथे १, तळेगाव दिघे येथे १, साकुर येथे २, निमोण येथे १, घुलेवाडी येथे ३, निळवडे येथे १, सुकेवाडी येथे ७, सोनुशी येथे १, वडगाव लांडगा येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ३९ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, हंगेवाडी, रहिमपूर, प्रतापपूर यासह नव्याने झरेकाठी येथे ही बांधीत रुग्ण आढळला आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.