संगमनेर Live | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शनिवार दि. १० ऑक्टोबर २०२० रोजी माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहीती व्हा. चेअरमन विश्वासराव कडू यांनी दिली.
डॉ. विखे पाटील कारखान्याच्या सन २०२०-२१ चा ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९ वा. आयोजित करण्यात आला आहे. चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रवरा सहकारी बॅंकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, ट्रक्स वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी, सभापती सौ. नंदाताई तांबे, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, चेअरमन सौ. गिताताई थेटे, जिल्हा परिषदेचे सदस्य सौ. रोहीणी निघुते, दिनेश बर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे विश्वासराव कडू यांनी सांगितले.
दरम्यान या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभास ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे आणि संचालक मंडळाने केले आहे.