◻ सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी बॅक व्यवस्थापक संदीप वालावलकर यांची माहिती.
संगमनेर Live | अहमदनगर जिल्हयात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक असेल त्या नुसार सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या रब्बी हंगामासाठी पीक कर्ज सर्व बँका मध्ये उपलब्ध असल्याची माहिती अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर (सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अहमदनगर) यांनी केले आहे. शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
सन २०२०-२१ च्या दि. ३० सप्टेंबर २०२० ला समाप्त होणाऱ्या खरीप हंगाम मध्ये जिल्हयातील सर्व बँका मिळून दिलेल्या लक्षांकाच्या ९२ टक्के इतके पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३८३६४९असून ३१२३ कोटी ४४ लाख इतके पीक कर्ज वाटप झाले आहे. या खरीप हंगामाच्या काळात कोविड-19 सारख्या विषाणूची साथ असतांनाही सर्व बँकर्सनी, बँकेत कर्मचाऱ्यांची कमी उपस्थिती असतानाही हे उदिष्ट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य केले आहे, असे वालावलकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.