◻ खते व औषधे घेण्यासाठी शेतकऱ्याने काढले होते कर्ज.
संगमनेर Live (राजू नरवडे) | खते औषधे घेण्यासाठी शेतकऱ्याने विविध सहकारी सोसायटी मधून २१ हजार रुपयांचे कर्ज काढले आणी ते पैसे दुचाकीच्या च्या डिक्की मध्ये ठेवले होते. मात्र चोरट्याने रोख रकमेसह दुचाकीही चोरून नेल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोजदरी येथील उत्तम भिकाजी डोंगरे यांची दुचाकी क्रमांक (एम. एच १४ ए. जे. ८६९४) ही गावातील संपत गोविंद मधे हे शेतकरी शुक्रवारी कोठे बुद्रुक याठिकाणी घेवून आले होते. त्यानंतर मधे यांनी विविध सहकारी सोसायटी मधून शेतीसाठी खते औषधे घेण्यासाठी २१ हजार रुपये काढले आणि ते पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवले व ते दुचाकीवरून घारगाव याठिकाणी आले अषता दुचाकी हाॅटेल सिताई समोर लावली होती. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह दुचाकी चोरून पोबारा केला. काही वेळाने मधे हे दुचाकी जवळ गेले असता त्यांना त्या ठिकाणी दुचाकी दिसली नाही, त्यांनी सगळीकडे शोध घेतला तरी ही दुचाकी सापडली नाही.
याप्रकरणी उत्तम डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३७५/२०२० भांदवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहे.