◻ एक दिवसाच्या दिलाशानतंर आश्वी परिसरातील गावानमध्ये पुन्हा बांधीत रुग्ण आढळले.
संगमनेर Live | मंगळवारी (१३ ऑक्टोबर) रोजी पुन्हा संगमनेर तालुक्यात ४२ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले असून सोमवारी आश्वी परिसराला मिळालेल्या दिलाशानतंर पुन्हा मंगळवारी आश्वी परिसरालातील गावानमध्ये रुग्ण आढळले आहेत.
मंगळवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे १४, संगमनेर खुर्द येथे १, ओझर खुर्द येथे १, निमगावजाळी येथे १, डिग्रंस येथे १, बोटा येथे १, भोजदरी येथे ३, कुरकुटवाडी येथे १, झोळे येथे १, चंदनापूरी येथे १, आंबी खालसा येथे ४, पिपंळे येथे १, कोळवाडे येथे २, गुंजाळवाडी येथे २, वरंवडी पठार येथे १, घुलेवाडी येथे १, राजापूर येथै २, पिपळगाव कोझिंरा येथे १, सारोळे पठार येथे १, कासार दुमला येथे १ व हिवरगाव पावसा येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ४२ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान एक दिवसाच्या दिलाशानतंर आश्वी परिसरातील गावानमध्ये पुन्हा रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करुन योग्य ती काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.