◻ पोलीस उप अधिक्षक रोशन पंडीत यांच्याकडून पोलीस पाटील यांच्या कामाचे कौतुक.
संगमनेर Live | कोविड - १९ या जागतीक आरोग्य संकटकाळात आप आपल्या गावात व परिसरात या आजाराचा संसर्ग होऊ नये, अथवा बांधीत रुग्ण आढळल्यास घ्यावयाची खबरदारी व मार्गदर्शन याबाबत सखोल मार्गदर्शन करुन कोविड - १९ च्या संकटात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल आश्वी पंचक्रोशीतील पोलीस पाटील यांचा संगमनेर चे पोलीस उप अधिक्षक रोशन पंडीत यानी प्रशासनाचा कोरोना योध्दा पुरस्कांर देऊन सन्मान केला आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी सन्मानार्थी पोलीस पाटील चिचंपूर खुर्द चे अशोकराव थेटे, निमगावजाळी चे दिलिप डेंगळे, उंबरी बाळापूर च्या सौ. वैशाली भगवान मैड, कनोली चे नानासाहेब वर्पे, औरंगपूर चे दत्तात्रय तळोले, ओझर खुर्द चे सुभाष खेमनर, कणकापूर चे संतोष शिदें, कनसेवाडी चे आण्णा बेरड, कुंभारवाडी चे रावसाहेब बरकडे, खळी चे मच्छिद्रं चकोर, खरशिंदे चे विठ्ठल सोनावणे, चिचंपूर बुद्रुक चे दत्तात्रय तांबे, चणेगाव चे भाऊराव लोहाळे, झरेकाठी चे सुदाम वाणी, प्रतापपूर चे विठ्ठल आंधळे, वरंवडी चे नामदेव केदारी, शेडगाव चे दिलिप सांगळे, शिबलापूर चे अशोक नागरे, सादतपूर चे सुनिल मगर, हंगेवाडी चे शिवाजी रोकडे याचां प्रशासनाकडून कोरोना योध्दा पुरस्कांर देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान यावेळी पोलीस उप अधिक्षक रोशन पंडीत यांनी उपस्थित पोलीस पाटील यांच्या कामाचे कौतुक केले असून यावेळी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, सर्व पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते.