संगमनेर Live (संजय गोपाळे) | संगमनेर तालुक्याचे धडाडीचे कार्यकर्ते व संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीषराव कानवडे यांची अहमदनगर उत्तर जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील सहयाद्री च्या कुशीत असलेल्या सवरचोळ या गावात त्यांचा जन्म झाला असून कुटुंबात पारंपरिक शेती व्यवसाय असल्याने त्यांनी प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागात तर व महाविद्यालयीन उच्च शिक्षण त्यांनी संगमनेर याठिकाणी घेतले. मुळातच शेतीची आवड व ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी राजकीय जोड हे समीकरण जुळून त्यांनी राजकारणात उडी घेतली. युवक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मोठे भरीव काम केले. त्यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम केले.
मुळातच शेती व्यवसाय असल्याने त्यांनी आपली शेती यशस्वी करून प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त करून आयुर्वेदिक शेती उभी करून त्यांनी नवीन क्रांती घडवली. अनेक वर्ष सातत्याने कामाचा पाठपुरावा करून आदिवासी भागाला न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. सतीशराव कानवडे यांनी आपले राजकीय काम करत असताना राजकारणात मतभेद झाल्याने संगमनेर तालुक्यात सत्ताधारी असलेला काँग्रेस पक्ष सोडून माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर कानवडे यांनी सातत्याने कामाचा पाठपुरावा करून पक्षामध्ये मानाचे स्थान मिळवले. याचीच दखल घेऊन सतिषराव कानवडे यांची भाजपा किसान मोर्चाच्या भाजपा उत्तर नगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी सतिषराव कानवडे यांची निवड केली असून माजी मंत्री व भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, स्नेहलताताई कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपचे युवा कार्यकर्ते अशोकराव कानवडे व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य सुनीताताई कानवडे आदीनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत सर्व सामांन्याचे प्रश्न सोडवून तळागाळापर्यंत काम करणार असल्याचे सतिष कानवडे यांनी सांगितले आहे.