◻ तात्काळ खड्डे बुजवा अन्यथा मांची फाट्यावर रास्ता रोको आदोंलनाचा सरुनाथ उंबरकराचा इशारा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील जोर्वे - उंबरी - आश्वी या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरीकाना मोठा त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावर दिवसे - दिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा मांची फाट्यावर रास्ता रोको आदोंलन करु. असा इशारा संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्ष नेते सरुनाथ उंबरकर यांनी दिला आहे.
सरुनाथ उंबरकर यानी प्रसिध्दिसाठी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संगमनेर ते जोर्वे व जोर्वे - उंबरी - आश्वी - कोल्हार या गावाना जोडणाऱ्या डांबरी रस्त्यावर ठिक - ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन दुचाकी ही चालवणे कठीण झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
उंबरी ते कँनोल पर्यतचा रस्ता पुर्णपणे खराब झाला असून गावातील एका शेतकऱ्याने त्याच्यां शेतातील मुरुम विक्री केल्यामुळे त्याची सपूंर्ण वाहतूक या रस्त्यावरुन झाल्याने रस्ता पुर्णतः खराब झाला. याबाबत संरपंच व ग्रामस्थानी महसूल विभागाकडे तक्रांर करुनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने लवकरचं जिल्हाधीकाऱ्याना भेटून निवेदन देणार असल्याचे प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान आश्वी - उंबरी - जोर्वे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग राहाता यांच्याकडे येत असून त्यानी ही या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत जोर्वे - रहिमपुर शिवेवर मोठा खड्डा पडल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे या रस्तावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ बुजवावेत व उंबरी ते कँनोल पर्यतचा रस्ता नव्याने करावा. अन्यथा मांचीहिल फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरुनाथ उंबरकर यांनी प्रसिध्दि पत्रकाद्वारे दिला आहे.
संगमनेर ते उंबरी या रस्त्यावर कोठेही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलक लावले नाहीत. त्यामुळे इतर ठिकाणाहून आलेल्या नागरीकाना मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी रस्ते अरुंद तसेच रस्ताच्या कडेला काटेरी झाडे वाढल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलक लावून तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा आक्रमक भुमिका घेऊ.
सरुनाथ उंबरकर
मा. विरोधीपक्ष नेते संगमनेर पंचायत समिती.