◻ डॉ. प्रणव गुणे याच्या घरी ५ फूट लांबीच्या विषारी नागाची हजेरी.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून बिबट्या पाठोपाठ विषारी नागासह इतर विषारी संर्प व हिस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. आद्याप कोणीही या प्राण्याच्या हल्याना बळी पडले नसले तरी वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे नागरीकाना भितीने ग्रासल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
आश्वी खुर्द येथिल डॉक्टर प्रणव गुणे यांच्या घरी दोन दिवसापूर्वी इंडियन ब्लँक कोब्रा या अति विषारी नागाने भष्याच्या शोधात हजेरी लावली होती. या कुटुंबाने प्रसंग सावधान राखत येथिल संर्पमित्र शिवा पवार याला फोनवरुन याबाबत माहिती दिली. क्षणाचाही विलबं न करता संर्पमित्र शिवा पवार याने डॉ. गुणे यांच्या घरी धाव घेऊन मोठ्या शिताफीने या विषारी नागाला बंदीस्तं करून लांब निसर्गात मुक्त केले आहे.
दैनंदिन परिसरातील वेगवेगळ्या गावानमध्ये लहान मोठ्या नागान बरोबरचं इतर विषारी संर्प आढळून येत असून यामुळे आद्याप कोणतीही मोठी दुर्घटना झाली नसली तरी या विषारी प्राण्याच्या दर्शनाने धडकी भरत असल्याने नागरीक दहशतीखाली वावरत आहेत.
तर मागील काही दिवसापासून बिबट्याचे हल्ले कमी झाल्यामुळे दिलासा मिळालेल्या शेडगाव, हंगेवाडी, पानोडी, शिबलापूर व माळेवाडी परिसरातील १२ ते १५ नागरीकाना मागील आठवड्यात लाडंग्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना ताजी असताना वाढत चाललेल्या या विषारी नागाच्या अस्तित्वामुळे नागरीकाची भिती वाढली आहे.
दरम्यान आश्वी सह पंचक्रोशीत मागील काही वर्षामध्ये बिबट्याची संख्या वाढल्यामुळे या बिबट्यानी मोठ्या प्रमाणावर मोर व मुगंसाची शिकार केली. संर्प हे मोर व मुगंसाचे खाद्य असून या प्राण्याची संख्या घटल्याने सापाची संख्या वाढल्याचा अंदाज एका जाणकार व्यक्तीने वर्तवला आहे. तर यावर्षी झालेल्या अती पावसामुळे पाणी थेट भुगर्भात गेल्यामुळे जमीनीखाली राहणारे हे प्राणी स्वता:चा जीव वाचवण्यासाठी वरती आल्यामुळे नागरीकाच्या नजरेस पडत असल्याचे बोलले जात आहे.