मंगळवारी संगमनेर तालुक्यात तब्बल ५४ कोरोना बाधीत रुग्णाची भर.

संगमनेर Live
0
निम्मे बाधीत रुग्ण शहरी भागातील तर आश्वी परिसरातील त्या पाच गावात आज पुन्हा रुग्ण आढळले.

संगमने Live | मंगळवारी (२४ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात ५४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आज शहरी भागाला हादरा बसला असून आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, प्रतापपूर, शेडगाव व निमगावजाळी या गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

मंगळवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर २७, आश्वी बुद्रुक येथे ३, उंबरी बाळापूर येथे ३, प्रतापपूर येथे १, निमगावजाळी येथे २, शेडगाव येथे १, जोर्वे येथे १, पेमगिरी येथे १, सावरगाव घुले येथे १, चिखली येथे १, झोळे येथे १, निमज येथे १, खदारमाळवाडी येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे १, धादंरफळ खुर्द येथे १, मंगळापूर येथे २, कसार दुमला येथे ३, वेल्हाळे येथे १, गुंजाळवाडी येथे १ व पिपळगाव देपा येथे १ असे एकून ५४ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.

दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, प्रतापपूर, शेडगाव व निमगावजाळी या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोना आजारापासून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी नागरीकानी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन करणे तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.

टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !