◻ आश्वी खुर्द येथे रंभाबाई फाऊडेशन कडून ‘ कोराना योध्दा ’ चा सन्मान.
संगमनेर Live | आपल्या सर्वाना नको असलेला कोरोना आजार हा दिवसेंदिवस बाळसेदार होऊन काही दिवसातचं त्याला येऊन एक वर्ष पूर्ण होणार आहे. हा आजार आपल्याला आणखीन मोठा होऊ द्याचा नसेल तर मास्क व सोशल डिस्टंसिगंचे पालन करावे लागेल. कारण दिपावली सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता पुढील दीड महिन्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भिती घुलेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. संदीप कचेरीया यांनी व्यक्त केली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रंभाबाई फाऊडेशन कडून आयोजित ‘ कोराना योध्दा ’ चा सन्मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. कचेरीया बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर संपत सांगळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निमगावजाळी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, पद्मश्री विखे पाटील कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, मकरंद गुणे, युन्नुस सय्यद, पत्रकार संजय गायकवाड, अनिल शेळके, माधवराव भोसले, बापूसाहेब गायकवाड, संजय खरात, चद्रंकात सोनवणे, डॉ. भानुदास आंधळे, दिपक महाजन, विकास सोनवणे, अनिल गांजवे, बाळासाहेब डहाळे, माणिक भवर, हवालदार विनोद गंभिरे आदिसह पुरस्करार्थी कोरोना योध्दा उपस्थित होते.
यावेळी डॉ. तय्यब तांबोळी यांनी कोरोनाबाबत माहिती देऊन नागरीकानी घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन करताना नागरीकाना योग्य त्या सुचना केल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फाऊडेशनचे युन्नुस सय्यद यांनी केले. यावेळी उपस्थित कोरोना योध्दानी सन्मान केल्याबद्दल रंभाबाई फाऊंडेशनचे आभार मानले असून फाऊंडेशनच्या सुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतील नागरीकानी कौतुक व अभिनंदन केले आहे.
दरम्यान या कार्यक्रमप्रसंगी तुकाराम गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, कुनाल डुबे, मोहन गव्हाणे, प्रकाश शिदें, रवीद्रं गायकवाड, बाळासाहेब मुन्तोडे, इद्रंभान गागरे, रघुनाथ जाधव, भास्कर बर्डे, संजय शिदें, सुरेश गायकवाड, सुभाष भडकवाड, चद्रकांत शिदें, नंदू जेडगुले, कौतिक तांबे, रामचंद्र गायकवाड, बाजीराव दातीर, महेश गायकवाड, आशासेविका सुनिता मुन्तोडे, छाया गायकवाड, तक्ते आदिसह नागरीक शासकीय नियमाचे पालन करत उपस्थित होते.