संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील रहिमपूर शिवारातील ओढ्यालगत असलेल्या धोकादायक वळणावरील जोर्वे - आश्वी रस्त्यावर सोमवारी सकाळी झालेल्या भिषण अपघातात सुकेवाडी येथिल अक्षय सोमनाथ गोसावी (वय - २५) या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी १० वाजेच्या सुमारास अक्षय गोसावी हा तरुण आपल्या दुचाकीवरुन आश्वीकडे येत होता. यावेळी समोरुन आलेल्या टँकर व अक्षयच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताचं रहिमपूरचे कामगार पोलीस पाटील आबासाहेब शिदें यांनी घटनास्थळी दाखल होत पोलीसाना घटनेची माहिती दिली. तर रुग्णवाहिका बोलावून स्थानिक नागरीकाच्या मदतीने अक्षयला संगमनेरला हालवले होते.
अपघात इतका भिषण होता की अक्षयचे जागीचं निधन झाल्याची चर्चा स्थानिक नागरीकानमध्ये सुरु होती. दरम्यान अक्षयच्या पश्चात आई व वडील असा परिवार असल्याची माहिती मिळाली असून हा तरुण आश्वी येथील एका दुचाकी शोरूम मध्ये नोकरीस असल्याची माहिती नागरीकानी दिली आहे. तर अक्षयच्या अकस्मात दुर्दैवी निधनामुळे सुकेवाडी सह आश्वी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
*******
आश्वी खुर्द येथिल लक्ष्मण जेडगुले यांचे निधन..
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले ग्रामपंचायत आश्वी खुर्द चे माजी पाणीपुरवठा कर्मचारी लक्ष्मण म्हाळबा जेडगुले (वय - ७३) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्याच्या पश्चात एक मुलगा, सुन, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी रावसाहेब जेडगुले यांचे ते वडील होत.