संगमनेर Live | मागील तीन गळीत हंगामामध्ये आलेल्या चागल्या वाईट तसेच कोरोना काळात आलेल्या कटू अनुभावाची शिदोरी पाठीशी घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासामुळे युटेक शुगर लि. या कारखाण्याचा आज चौथा गळीत हंगाम सुरु झाला आहे. युटेक कारखाना जिल्ह्यातील इतर कारखाण्याशी कोणतीही स्पर्धा करण्याऐवजी ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यातील आश्रु पुसण्याचे काम करणार असून मागील वर्षी युटेकने शेतकऱ्याना दराबाबत दिलेल्या २ हजार ५११ या शब्दानुसार शेतकऱ्यांची राहिलेली उर्वरीत २६० रुपये रक्कम दिवाळीपुर्वी शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करणार असल्याचे प्रतिपादन युटेक शुगरचे संस्थापक अध्यक्ष रवीद्रं बिरोले यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे बुधवारी सकाळी कारखाना कार्यस्थळावर आयोजित युटेक शुगर कारखाण्याच्या चतुर्थ गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना रवीद्रं बिरोले बोलत होते. यावेळी संचालिका अश्विनीताई बिरोले, संचालक शंतनु बिरोले, ईशाताई बिरोले, पोर्णिमा पारेख, नदंंन बिरोले, जेष्ठ संचालक अँड. रामदास शेजुळ, भाऊसाहेब शेजुळ, हरीभाऊ गिते, सुभाष कोळसे, बापू धुळगंड, एकनाथ नागरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव शेटे, तान्हाजी बागुल, एकनाथ वर्पे, रामदास राहाणे, बढे, गोरक्ष डहाळे, तुकाराम जाधव, वसंत चरमरल, भाऊसाहेब मंडलिक आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बिरोले पुढे म्हणाले की, चालू वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस गाळापासाठी तयार असताना अतिवृष्टी झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतू शेतकऱ्यानी घाबरुन जाऊ नये असे सांगताना येणारा काळ हा युटेक कारखाण्याचा असून या वर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून जास्तीत जास्त प्रमाणात ऊस गाळपाचे उद्दिष्टे कारखाण्याने डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण सुरु केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी ही मोठ्या संख्येने कारखाण्याच्या पाठीशी उभे आहेत.
मागील हंगामात झालेले अर्थिक नुकसान व कोरोना काळात अनेकांनी दिलेला नाहक त्रास यामुळे मनस्ताप सहन करावा लागला असला तरी आम्ही आमचा शब्द पाळणार असून दिवाळीपुर्वीचं मागील वर्षाची शेतकऱ्यांची राहिलेले उर्वरीत २६० रुपये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याचे सागून बिरोले यांनी शेतकऱ्याना ऊस तोडणीसाठी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमासाठी बाबाजी सागर, सुभाष घुले, भगीरथ शेटे, भाऊसाहेब तोडकर, अजित गुळवे, आण्णासाहेब काळनर, तुकाराम जाधव, त्रिबंक बढे, माजीद फारुकी, कैलास डोगंरे, लालुभाई शेख, लक्ष्मण गिते, श्रीरंग गायकवाड आदिसह ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना प्रशासनातील कर्मचारी हे शासकीय नियमाचे पालन करत उपस्थित होते.
हंगामी कामगाराना २० टक्के पगार वाढ..
या वर्षी युटेक कारखाण्याने मागील तीन हंगामामध्ये कार्यरत असलेल्या हंगामी कामगाराना २० टक्के, दोन हंगामात कार्यरत असलेल्या हंगामी कामगाराना १५ टक्के तर मागील एक हंगामापासून कार्यरत असलेल्या हंगामी कामगाराना १० टक्के पगारवाढ केली असल्याची माहिती युटेकचे संस्थापक रवीद्रं बिरोले यांनी पत्रकाराशी बोलताना दिल्यामुळे हंगामी कामगारानमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.