◻ चाचणी सर्व व्यावसायिकासाठी बधंनकारक ; आरोग्य विभागाची माहिती.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यासह आश्वी परिसरातील गावानमध्ये दिवसेंदिवस कोराना बाधीत रुग्णाची संख्या वाढत असल्याने आश्वी बुद्रुक येथिल न्यू इंग्लिश स्कूल येथे उद्या शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी परिसरातील नागरीकाच्या संरक्षणासाठी मोफत कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आश्वी बुद्रुकसह परिसरातील गावातील ग्रामस्थांनी कोणतीही शंका मनात न बाळगता व न घाबरता आपल्या स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाजाच्या संरक्षणासाठी स्वतः ची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले असून यावेळी कोणतीही व्यक्ती बांधीत आढळून आल्यास त्याना योग्य मार्गदर्शन व मोफत औषधोपचार दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच सर्व दुकानदार, व्यावसायिक, सलून दुकानदार, भाजीपाला विक्रेते, मेडिकल स्टोअर्स, सर्व संस्थांचे कर्मचारी यांनी कोव्हीड चाचणी करणे बंधनकारक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून रोजच्या कामकाजात अनेक व्यक्तीशी संपर्क येत असलेल्या सर्व व्यक्तीनी स्वयंस्फूर्तीने चाचणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे.
दरम्यान नाव नोंदणी सकाळी १० ते १२ या वेळेतच केली जाणार असून याबाबत अधिक माहितीसाठी निमगावजाळी आरोग केद्रांचे प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी 9657967796 व दिपक महाजन 8698939310 तसेच आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.