संगमनेर Live | संगमनेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या व आर्थिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या हंगेवाडी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या आश्वी खुर्द शाखेचा शुभारंभ उद्या सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी सभापती गणपतराव सांगळे यांनी दिली.
******
आश्वी खुर्द येथील शिबलापूर आश्वी रस्त्यालगत स्वराज्य कॉम्प्लेक्स च्या दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त व सुसज्ज इमारतीत उद्या सोमवारी दुपारी चार वाजता संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते शाखेचे उध्दघाटन होणार आहे.
******
या संस्थेमार्फत आश्वी परिसरातील नागरिकांना मोठे आर्थिक पाठबळ मिळणार असून ग्राहकांना सोने तारण, बचत गट कर्ज, कॅश क्रेडीट कर्ज, फिक्स परचेस कर्ज सुविधा मिळणार आहेत.
या कार्यक्रमास नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधर, संस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ वाघ, संचालक नामदेवराव नागरे, नारायण नागरे, हरिभाऊ कांगणे, कांतीलाल डहाळे, कारभारी शेळके, प्रतीक सांगळे, सौ. अनुसया केकाण, सौ. शकुंतला सांगळे, सुभाष रोकडे, हरिभाऊ सानप आदींनी केले आहे.