संगमनेर Live | अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या आयएसओ मानंकन प्राप्त आश्वी बुद्रुक येथील आश्विनी ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्थेच्या आश्वी खुर्द शाखा क्रमांक चार चा सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. शुभारंभ होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मेजर संपतराव सांगळे यांनी दिली.
******
आश्वी खुर्द येथील सेवा सोसायटीच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त व सुसज्ज जागेत उद्या सोमवारी सकाळी १० वा. हभंप शितलताई साबळे यांच्या हस्तें शाखेचे उध्दघाटन होणार असून, या संस्थेमार्फत आश्वी खुर्द येथील नागरिकांना मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. संस्थेने सभासदाना १५ टक्के डिव्हिडंड दिला असून सतत ऑडिट वर्ग अ राहिला आहे.
******
संस्थेमार्फत ग्राहकांना सोने तारण, बचत गट कर्ज, कॅश क्रेडीट कर्ज, फिक्स लोन, हायपरचेस कर्ज सुविधा मिळणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापुसाहेब भवर, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, पंचायत समिती सदंस्य निवृती सांगळे, माजी सरपंच तात्यासाहेब गायकवाड, संस्थापक गंगाधर आंधळे, व्यवस्थापक बाळासाहेब डहाळे, तुळशीराम म्हस्के, अँँड. संजय गांधी, दादाहारी गिते, सुभाष बोन्द्रे, सौ. हिराबाई नागरे, सौ. सुनंदा भोसले, सिताराम गिते, रघुनाथ जाधव, भगवान खामकर, चंद्रकांत सोनवणे, डॉ. अनिल बालोटे आदींनी केले आहे.
******