◻ अँट्रॉसिटी कायद्यातर्गत गुन्हा दाखल ; आरोपी पोलीसाच्या ताब्यात.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय आदिवासी महिलेचा चणेगाव येथील गोकूळ ढमक यांने विनयभंग केल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात विनयभंग व अँट्रॉसिटी कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसानी ताब्यात घेतले आहे.
******
याबाबत आश्वी पोलीसानी दिलेली अधिक माहिती अशी की, १३ नोव्हेंबर रोजी झरेकाठी (ता. संगमनेर) शिवारातील गोरख वाघमारे यांच्या शेतात ३४ वर्षीय आदिवासी महिला शेळ्या चारण्यासाठी गेली होती. यावेळी पाळत ठेवून गोकूळ ढमक हा महिलेजवळ आला व पैशाचे अमिष दाखवून त्याने महिलेचा हात धरुन ओढला. तसेच या महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे या महिलेने आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
*******
******
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टंर नबंर ४३९/२०२० प्रमाणे भादंवी कलम ३५४ (अ) (ड) व अनसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा ३(१) (११) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहेत. तर या गुन्ह्यातील आरोपीला पोलीसानी ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे.
******