◻ शहरी भागाची रुग्ण संख्या वाढली तर आश्वी बुद्रुकची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल.
संगमने Live | मंगळवार (१७ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ५६ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून आज शहरी भागासह आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, खळी व चिचंपूर या गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आश्वी बुद्रुक येथे दिवसेंदिवस बांधीताची संख्या वाढत असल्याने आश्वी बुद्रुकची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
******
मंगळवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर १२, आश्वी बुद्रुक येथे ८, उंबरी बाळापूर येथे १, खळी येथे १, चिचंपूर येथे १, गोडसेवाडी येथे १, बोरबन येथे २, घारगाव येथे ६, वेल्हाळे येथे १, राजापूर येथे २, मंगळापूर येथे २, घुलेवाडी येथे १०, सुकेवाडी येथे १, पिपळगाव देपा येथे २, निमगाव खुर्द येथे १, पिपंरणे येथे १, कौठ कमळेश्वर येथे १, गुंजाळवाडी येथे १, समनापूर येथे १ व कणकापूर येथे १ असे एकून ५६ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
******
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, खळी व चिचंपूर या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी सणासुदीच्या काळात या आजारापासून स्वत: चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन व प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.