◻ शहरासह ग्रामिण भागाची रुग्ण संख्या घटली तर आश्वी परिसरातील ‘ त्या ’ दोन गावात आज पुन्हा बाधीत रुग्ण.
संगमने Live | बुधवार (२५ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात २३ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आज शहरी भागाला दिलासा मिळाला असून आश्वी परिसरालातील उंबरी बाळापूर व निमगावजाळी या दोन गावामध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर ११, उंबरी बाळापूर येथे २, निमगावजाळी येथे १, दाढ बुद्रुक येथे १, धादंरफळ खुर्द येथे १, चिखली येथे २, साकुर येथे १, घुलेवाडी येथे १, मेढंवन येथे १, मंगळापूर येथे १ व सुकेवाडी येथे १ असे एकून २३ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर व निमगावजाळी या दोन गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोना आजारापासून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी नागरीकानी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन करणे तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.