खा. डॉ. सुजय विखे पाटील याच्या वाढदिवसानिमित्त तरुणानी केला नेत्रदानाचा संकल्प.

संगमनेर Live
0

ओझर खुर्द येथिल तीन तरुणाच्या प्रेरणादायी उपक्रमाची सर्वत्र चर्चा.

आपल्या लाडक्या युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथिल प्रविण उर्फ बबलू शेपाळ, अक्षय पितळे व प्रदिप कदम या तीन तरूणानी अतिशय वेगळा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला असून या तरुणानी स्वंइच्छेने मरनोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प केेला आहे.


*******


*******

२४ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस होता. या दिवशी ओझर खुर्द येथील प्रविण उर्फ बबलू शेपाळ, अक्षय पितळे व प्रदिप कदम या तीन तरूणानी आपल्या लाडक्या नेत्यावरील श्रध्देपोटी अंध व्यक्तीच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा यासाठी मरनोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प केला. यावेळी या तिघानी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन नेत्रदान इच्छापत्राची पुर्तता केली आहे.

जगात सुमारे आठ कोटी अंध व्यक्तींपैकी २५ टक्कें लोक भारतात आहेत. त्यातील वीस लाखांपेक्षा जास्त व्यक्ती बुबुळातील दोषामुळे अंध झालेले आहेत. यात तरुण आणि लहान मुलांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातील एकूण अंध व्यक्तींमध्ये १२ वर्षांखालील मुलांचे प्रमाणे सर्वांत जास्त आहे. या अंध मुलांना दृष्टी मिळण्यासाठी नेत्रदानाची गरज आहे. त्यामुळे मरणोपरांत नेत्रदान करून या अंध मुलांना दृष्टी मिळवून देण्यास मदत करण्याचे आवाहन या तीन तरुणानी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केले आहे.

दरम्यान ओझर खुर्द गावात प्रविण उर्फ बबलू शेपाळ, अक्षय पितळे व प्रदिप कदम हे वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी हिरहिरीने सहभाग घेत असताना, गावातील गोर गरीब जनतेला अडचणीच्या काळात मदत करत असल्यामुळे या तरुणाचे नेहमी कौतुक होत असताना त्यानी स्वंइच्छेने नेत्रदान करण्याचा संकल्प केल्यामुळे

‘ मरावे परी नेत्र रुपी उरावे,
नेत्रदान एक पवित्र दान ’

या त्याच्या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !