◻ आश्वी परिसरातील तब्बल ६ गावानमध्ये आज पुन्हा बाधीत रुग्ण आढळले.
संगमनेर Live | गुरुवार (२६ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ४६ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आज शहरी भागासह ग्रामीण भागातही रुग्ण संख्या वाढली असून आश्वी परिसरालातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, चिचंपूर, कनोली, खळी व निमगावजाळी या सहा गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
*******
गुरुवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहरी भागात १३, उंबरी बाळापूर येथे २, आश्वी बुद्रुक येथे १, चिचंपूर येथे २, कनोली येथे १, खळी येथे १, निमगावजाळी येथे ३, जोर्वे येथे १, पिपंरणे येथे १, सोनुशी येथे १, चिखली येथे ५, खंदारमाळ येथे १, चंदनापूरी येथे १, केळेवाडी येथे १, गुंजाळवाडी येथे ४, वाघापूर येथे १, कासार दुमला येथे १, निमगाव टेभीं येथे १, घुलेवाडी येथे १, मंगळापूर येथे १, घारगाव येथे १, तळेगाव दिघे येथे १ व चिकणी येथे १ असे एकून ४६ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, चिचंपूर, कनोली, खळी व निमगावजाळी या सहा गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोना आजारापासून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी नागरीकानी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन करणे तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.